रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 143 चाचण्या, 10 पॉझिटिव्ह

 


अकोला,दि. 18 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज दिवसभरात झालेल्या 143 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, पातूर, तेल्हारा, व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तर अकोट येथे 43 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे 24 चाचण्या झाल्या त्यात एकाचा  अहवाल पॉझिटिव्ह आला. बाळापूर  येथे दोन  चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.  तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही, 57 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17 चाचण्या झाल्या त्यापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात  143 चाचण्यांमध्ये  10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 15509  चाचण्या झाल्या त्यात 1029 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

काल (दि. 17) रोजी 73 चाचण्या घेण्यात आल्या. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात  अकोला आयएमए येथे  नऊ चाचण्या झाल्यात त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 61 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन  चाचण्या झाल्या त्यापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ