महात्मा बसवेश्वर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन






            अकोला दि.22(जिमाका)- महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आज अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते  महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महात्मा बसवेश्वर यांनी जातीभेद निर्मूलन व समानतेसाठी कार्य केले, त्यांचे कार्य व विचार आजही प्रेरणादायी आहे,असे उद्गार या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी काढले.  यावेळी महाराष्ट्र विरशैव्य सभाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ हजारे, उपाध्यक्ष महेश शेटे, राजेश रामगवळी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना