अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकीत निवासी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश

 अकोला,दि. १३(जिमाका)-  अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत विनामुल्य मिळतील, असे प्रकल्प अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.

प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक ८ मे २०२३ आहे.

 इयत्ता पहिलीध्ये प्रवेश घेण्यासाठी अटीशर्ती खालीलप्रमाणे -

 १.  विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. जातीच्या दाखलाची साक्षांकीत प्रत सोबत जोडावी.

 २.  इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय वर्ष पुर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा सोबत  जोडावा.

 ३. पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा एक लाख रुपयांच्या आत असावी.

    (तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा)

 . विद्यार्थ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी.

 ५.या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालका।नी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र जोडावे.

 ६. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.

७.अपुर्ण कागदपत्र असल्यास तसेच खोटी माहीती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

भुलथापांना बळी न पडण्याचे पालकांना आवाहन

            या संदर्भात पालकांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये. अन्य कोणत्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन  तसेच नजिकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावा व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयास सादर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ