सामाजिक न्याय समता पर्व;समाजकल्याण कार्यालयात मार्गदर्शन कार्यशाळा






अकोला,दि. 6 (जिमाका)-: येथील समाज कल्याण कार्यालयात सामाजिक न्याय समता पर्वांतर्गत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेतीसंबंधित योजना व सामाजिक न्याय विभागाच्या योजनाची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ‘न्याय समता पर्वा’अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त उमेश सोनोने, जिल्हा परिषद कृषी अधिकारी जयंत सोनोने, बार्टीचे विजय बेदरे, समाजकल्याण विभागाचे विशेष अधिकारी प्रदिप सुसतकर, कार्यालय अधिक्षक आर.एस.ठाकरे,  रावसाहेब बोदळणकर, निरीक्षक उमा जोशी, प्रसाद सुर्यवंशी,  जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे वाघमारे, आदि उपस्थित होते.

            मार्गदर्शन कार्यशाळेत उपायुक्त उमेश सोनोने यांनी रमाई घरकुल योजना व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसदंर्भात माहिती दिली. तसेच  अनुसूचित जाती घटकांतील गरजू लाभार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागासोबतच इतर विभागाच्या योजनांची माहिती करुन घ्यावी. या योजनाची तळागावाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपस्थितांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.  महामानवांचे विचार आपल्या जिवनात आत्मसात करण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उमेश सोनोने यांनी केले.

            कृषी अधिकारी जयंत सोनोने यांनी कृषी स्वालबंन योजनेची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली. सामाजिक न्याय विभागाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शेतजमिन उपलब्ध करुन दिली आहेत. या जमिनीवर पिकांचे सुयोग्य व्यवस्थापन व आर्थिक नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होवून कूटूंबाचे राहणीमान उचांवण्यास मदत होईल. शेतजमिनीमध्ये पारंपारीक पिकासोबत फळशेती, चंदन लागवड, फळभाजी इत्यादी पिके घेतल्यास बारामाही आर्थिक उत्पनाचे साधन मिळू शकते, असेही प्रतिपादन जयंत सोनोन यांनी केले. यावेळी लाभार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचे समाधान केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यांत आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक विशेष अधिकारी प्रदीपजी सुसतकर यांनी केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादुत प्रज्ञा खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली गवई यांनी केले. या कार्यक्रमाकरीता सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय वसतिगृहातील गृहपाल, स्वाभिमान योजना व रमाई आवास योजनेचे बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ