कोविडः दोन पॉझिटीव्ह

            अकोला दि.22(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 77  जणांचा अहवाल प्राप्त झाला.  त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 2.

आरटीपीसीआर ‘दोन’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हे दोन्ही रुग्ण पुरुष असून अकोट तालुक्यातील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.

सक्रिय रुग्ण ‘12

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66187(50054+15142+991) आहे. तर सहा  रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ