शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात पशुवैद्यक क्षेत्राचे योगदान-कुलगुरू डॉ. शरद गडाख

 



अकोला, दि.२६(जिमाका)- पशुपालन हा आता शेतीपूरक जोडधंदा राहिला नसून स्वतंत्र व्यवसाय म्हणून नावारूपाला येत आहे. दूध, अंडी, मांस इत्यादी पशूजन्य उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होत असून यात पशुवैद्यक क्षेत्राचे भरीव योगदान आहे,असे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर चे कुलगुरु डॉ. शरदराव गडाख यांनी व्यक्त केले.

जागतिक पशुवैद्यक दिनाचे औचित्य साधत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे ‘पशुवैद्यक शास्त्रातील निदान व उपचारांतील तांत्रिक प्रगती व प्राण्यांची काळजीह्या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी (मंगळवार दि.२५) ते बोलत होते. कामधेनु विद्यापीठ, गांधीनगरचे कुलगुरु डॉ. एन. एच.केलावाला, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर येथील अधिष्ठाता व संचालक शिक्षण प्रा. डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक संशोधन प्रा. डॉ.नितिन कुरकुरे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ.धनंजय दिघे हे होते.

डॉ.केलावाला ह्यांनी इसवी पूर्व काळापासून असलेला पशुवैद्यक क्षेत्राचा गौरवपूर्ण इतिहास सर्व उपस्थितांना विषद करीत पशुवैद्यक क्षेत्रातील उपचार व निदान हयांतील नवनवीन प्रगत तंत्रज्ञान, मुक पशूंची वेदना शमनाकरीता प्रभावी उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.या परिषदेत देशातील विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील एकूण २८६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तीन दिवस ही परिषद आहे. प्रास्ताविक सचिव. डॉ. रत्नाकर राऊळकर,सूत्रसंचालन डॉ.महेश इंगवले ह्यांनी  तर आभार प्रदर्शन डॉ. कुलदीप देशपांडे ह्यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ