डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अभ्यास दिन व रक्तदान शिबीर

 



अकोला,दि. १८(जिमाका)-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अकोला जिल्हा वकील संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  अभ्यास दिन साजरा करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.के. केवले यांच्या मार्गदर्शनात आयोजित अभ्यास दिनानिमित्त पुस्त्क प्रदर्शन व पुस्तक वाचन करण्यात आले. त्यात सर्व विधीज्ञ, न्यायाधीश आदींनी सहभाग घेतला.  उद्घाटन जिल्हा न्यायाधीश सुनिल पाटील व विवेक गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायाधीश अनिल काळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, वकील संघाचे प्रवीण तायडे, देवाशिष काकड आदी उपस्थित होते. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

०००००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ