कोविडः चार पॉझिटीव्ह
अकोला
दि.27(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 72 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात चार
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.4 व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4.
आरटीपीसीआर
‘चार’
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात चार महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला
महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी एक व अकोला ग्रामीण येथील दोन याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.
सक्रिय रुग्ण ‘16’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66197(50064+15142+991) आहे. तर एक रुग्णास डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 16 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा