कोविडः तीन पॉझिटीव्ह

   अकोला दि.१९(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) १०१ जणांचा अहवाल प्राप्त झाला.  त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.  व खाजगी ०)+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०=एकूण पॉझिटीव्ह .

आरटीपीसीआर ‘तीन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या तिनही रुग्ण महिला असून अकोला, अकोट व पातूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.

सक्रिय रुग्ण ‘२५

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या६६१८३ (५००५०+१५१४२+९९१) आहे.  एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ