ग्रामपंचायत पोटनिवडणूक: मागासवर्ग प्रवर्गातच्या अतिरिक्त जागेकरिता आरक्षण सोडत जाहिर


अकोला दि.10(जिमाका)- ग्रामपंचायत पोटनिवडणू कार्यक्रमानुसार निधन, राजीनामा अनर्हता किंवा इतर अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूका घोषीत झाले आहे. त्यानुसार पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या अतिरिक्त ठरणाऱ्या जागांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहिर झाला आहे, अशी माहिती ग्राप/जिप/पंस/ निवडणूक विभागाचे  प्रभारी अधिकारी तथा उपजिहाधिकारी यांनी दिली.

  आरक्षण कार्यक्रम याप्रमाणे :  मंगळवार दि. 11 एप्रिल 2023 रोजी कार्यक्रमानुसार ज्याठिकाणी सोडत काढणे आवश्यक आहे तिथे सोडतीकरीता विषेश ग्रामसभेची सूचना देणे.  गुरुवार दि. 13 एप्रिल 2023 रोजी विशेष ग्रामसभेमध्ये आवश्यकतेनुसार सर्वसाधारण जागा निश्चित करण्यासाठी  सोडत.  सोमवार दि. 17 एप्रिल रोजी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनामध्ये सुधारणा करुन त्याबाबत योग्य ती सूचना व प्रसिद्धी देणे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ