कोविडः एक पॉझिटीव्ह
अकोला
दि.24(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 19 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर
‘एक’
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात एका महिलेचा अहवाल
पॉझिटीव्ह आला असून हा रुग्ण बाळापूर तालुक्यातील रहिवासी आहेत, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.
सक्रिय रुग्ण ‘11’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66188(50055+15142+991) आहे. तर दोन रुग्णास डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा