शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ; शनिवारपर्यंत हरकती मागविल्या


अकोला,दि. 13 (जिमाका)-  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे प्राथमिक छाननी गुणांकन तक्ता प्रकाशित करण्यात आला आहे. यासंदर्भात आक्षेप किंवा हरकती असल्यास शनिवार दि. 15 एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंर्तगत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा परस्कार, राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू),शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.  या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेल्या गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह संचालनालयाच्या  https://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्राथमिक छाननी गुणांकन तक्यातील माहिती संदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ई-मेल आयडीवर विहित नमुन्या कळविण्यात यावे,  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ