जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

 




अकोला, दि.११(जिमाका)- महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने,अधीक्षक मिरा पागोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस अधीक्षक मिरा पागोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ