भूमिसंपादन नियमात सुधारणा

 अकोला,दि. १९(जिमाका)-  भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ मधील नियम १९ मध्ये सुधारणा करण्यात आली असल्याची अधिसुचना प्रसिद्ध झाली आहे,असे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.

सुधारणेनुसार, या नियमास भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना  उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र)(सुधारणा) नियम २०२३ असे संबोधण्यात येणार असून  त्यातील नियम १९ च्या पोट नियम ३ नंतर नविन पोटनियम दाखल करण्यात आला आहे. हा नियम ४ असून त्यात म्हटले आहे की,  जेव्हा भूमिसंपादन अधिनियम १८९४ (१८९४ चा १) याच्या कलम ११ खालील निवाडा १ जानेवारी २०१४ पूर्वी घोषित करण्यात आलेला नसेल तेव्हा, अशा प्रकरणी भरपाईची परिगणना करण्याकरीता बाजार मूल्य निश्चित  करण्याची तारीख ही, अधिनियमाच्या प्रारंभीची म्हणजेच १ जानेवारी २०१४ ही असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा