सामाजिक समता पर्व: जात प्रमाणपत्र पडताळणी समितीव्दारे पातूर येथे मार्गदर्शन शिबीर


अकोला दि.27(जिमाका)-  सामाजिक न्याय विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे यांच्यामार्फत दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 दरम्यान सामाजिक समता पर्व राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने बुधवार दि. 26 एप्रिल रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने राजनंद अकॅडमी ता.पातूर येथे जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक किरण निखाडे व सै. रफीक सै. हुसेन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश सोनवणे यांनी केले.यावेळी राजनंद अकॅडमी पातूरचे संचालक बलकरी व बोरकर, जातपडताळणी कार्यालयाचे विशाल राठोड,महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ