क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण; 27 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन


अकोला दि.22(जिमाका)- जिल्हा क्रिडा कार्यालयामार्फत क्रीडा शिक्षकांचे 10 दिवसांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. 2 मे ते 12 मे 2023 या कालावधीत होणार आहे. या प्रशिक्षण शिबीरात 100 क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व अनुदानीत, विनाअनुदानीत, उच्च व माध्यमिक, प्राथमिक शाळा व आश्रम शाळा येथील क्रीडा शिक्षकांनी गुरुवार दि. 27 एप्रिलपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे नोंदणी करावी. प्रथम नोंदणी करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा प्राधान्याने विचार केल्या जाईल. इच्छुक क्रीडा शिक्षकांनी प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ