निःस्वार्थ भावनेने करा भूतदयेचे कार्य- जिल्हाधिकारी निमा अरोरा: प्राण्याचे उपचार, शुश्रूषा कार्यासाठी मदत करणाऱ्यांचा सत्कार

 





अकोला, दि.२५(जिमाका)- जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या बेवारस प्राण्यांचे उपचार व शुश्रूषा गृहासाठी विविध मदत करणाऱ्या व्यक्ति व संस्थांचे योगदान मोलाचे आहे. आपले हे भूतदयेचे कार्य निःस्वार्थ भावनेने असेच सुरु ठेवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या वतीने आज प्राणी उपचार व शुश्रूषेच्या कार्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्ति व संस्थांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या माध्यमातून भटक्या, बेवारस असणाऱ्या जखमी झालेल्या, आजारी प्राण्यांच्या उपचारासाठी केंद्र चालविले जाते. ह्या ठिकाणी जनावरांच्या उपचार व देखभालीसाठी येणारा खर्च समाजातील दानशूर व्यक्तिंच्या व संस्थांकडून मिळणाऱ्या दानातून चालविला जातो. अशा दानशूर व्यक्तिंचा व संस्थांचा आज सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. तुषार बावने, डॉ.विनय लांडे, प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे सदस्य, प्राणी प्रेमी नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन प्राणी कल्याण कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ