कोविडः ‘तीन पॉझिटीव्ह’


   अकोला दि.11(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 105 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3 व खाजगी 0)3+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 3.

आरटीपीसीआर ‘तीन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन पुरुषांचा समावेश असून हे रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘37

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66169(50036+15142+991) आहे. चार रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 37 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील तीन रुग्ण  रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 34 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ