जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन







अकोला,दि. 14(जिमाका)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात अभिवादन करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, किशोर बढी, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक सतिश बगमारे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मोहन साठे, विजय कोरकाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ