कोविडः दोन पॉझिटीव्ह
अकोला
दि.26(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 68 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोन
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 2.
आरटीपीसीआर
‘दोन’
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात दोन जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व एक महिलेचा समावेश असून हे रुग्ण बार्शीटाकळी व
मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.
सक्रिय रुग्ण ‘13’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66193(50060+15142+991) आहे. तर एक रुग्णास डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 13 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा