कोविडः ‘चार पॉझिटीव्ह’


   अकोला दि.7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 66 जणांचा अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय मार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 4 व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4.

‘चार पॉझिटिव्ह’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एम महिला व तीन पुरुषांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक तर उर्वरित तीन जण बार्शीटाकळी तालुक्यातील रहिवाशी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘41’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66164(50031+15142+991) आहे. दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 41 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सात रुग्ण  रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 34 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ