सामाजिक न्याय पर्वानिर्मित्त सामाजिक न्याय विभागात उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळा


 अकोला,दि. २८ (जिमाका)-  सामाजिक न्याय विभागाव्दारे दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 दरम्यान "सामाजिक पर्व अभियानअंतर्गत" समाजकल्याण कार्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुरुवार दि.27 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन, अकोला येथे शासनाच्या योजनाची माहिती व उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नवउद्योजकतांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.

उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये तरुणांना उद्योग व्यवसायातील विविध संधी, शासनाच्या विविध योजना, उद्योग उभारण्यासाठी आवश्यक गोष्टी, तंत्रज्ञानाची आवश्यकता, कौशल्य विकसित करण्याच्या बाबी, मॅनपावर, विविध साधनसामुग्री, उद्योगाचे व्यवस्थापन, मशनरी यासह विविध विषयावर नवउद्योजक, लीड बॅकेचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी तसेच विविध महामंडळाचे प्रतिनिधीनी मार्गदर्शन केले.

बहूजन समाजातील तरुणांनी आपल्या पूर्ण क्षमतांचा वापर करुन समाज उपयोगी उद्योग उभारावे. यासाठी  सामाजिक न्याय विभाग अशा तरुणांनाच्या नेहमीच पाठीशी उभी राहिल, अशी ग्वाही समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी दिली.

जागतिकरण स्पर्धेच्या युगात उद्योगाना अनेक संधी उपलब्ध असुन बहूजन समाजातील तरुणांनी या संधीचा फायदा घेत उद्योग विश्वात स्वताचे अस्तितव निर्माण करावे. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणाऱ्यांची भूमिका निश्चितच समाज हितासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन विशेष अधिकारी प्रदिप सुसतकर यांनी व्यक्त केले.

सामाजिक न्याय भवन, अकोला येथे नवउद्योजकांसाठी उद्योजकता व मार्गदर्शन एक दिवशीय शिबीर घेण्यात आले.  यावेळी  समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, विशेष अधिकारी प्रदिप सुसतकर, समाजकल्याण निरिक्षक उमेश वाघ, अतुल गोगटे, नवउद्योजक राजेश तायडे, रणजीत सरदार, उमेश इंगळे, सामाजिक न्याय विभागाचे अंतर्गत विविध महामंडळाचे प्रतिनिधी  उपस्थित होते. तसेच यावेळी केंद्र शासनाच्या स्टॅन्ड अप इंडिया योजना व औद्योगिक सहकारी संस्थाना अर्थसहाय केलेल्या संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

समाजकल्याण विभागाच्या योजनेच्या माध्यमातून यशस्वी उद्योग उभारलेल्या उद्योजकांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील बहूजन समाजाचे तरुण, स्थानिक शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ