कोविडः ‘तीन पॉझिटीव्ह’
अकोला दि.13(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 80 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
सर्वोपचार रुग्णालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3 व खाजगी 0)3+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण
पॉझिटीव्ह 3.
आरटीपीसीआर
‘तीन’
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन पुरुष व एक महिलाचा
समावेश असून हे रुग्ण पातूर, मुर्तिजापूर व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक
एक प्रमाणे रहिवाशी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार
रुग्णालयातून प्राप्त झाली.
सक्रिय
रुग्ण ‘25’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66177(50044+15142+991)
आहे. आठ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 25 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील दोन रुग्ण रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 23 जणांवर होम आयसोलेशन
मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा