मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात सामाजिक न्याय पर्वानिमित्त विविध उपक्रम


अकोला,दि. 14(जिमाका)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत सामाजिक न्याय पर्व साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबीर व मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल एस.एस. लव्हाळे यांनी दिली.

            सामाजिक न्याय पर्वानिमित्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नविन, हनुमान बस्ती, अकोला येथे सोमवार दि.3 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत निबंध स्पर्धा घेण्यात आले. शुक्रवार दि. 7 रोजी वसतीगृहातील मुलांचे आरोग्य शिबीरांमध्ये तपासण्या करण्यात आले. त्यानंतर मंगळवार दि. 11 रोजी महात्मा फुले जयंती निमित्त श्री. सिरसाट यांनी महात्मा फुले यांच्या विचारावर मार्गदर्शन केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ