अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन


            अकोला दि.28(जिमाका)-प्रादेशीक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि. 2 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. यादरम्यान ताशी 40-50 किमी याप्रमाणे वारा वाहणाची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षीत ठिकाणी साठवावा.  बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षीत ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही;याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.

            मार्गदर्शक सूचना याप्रमाणे : हवामान  विषयक व विजेबाबत अद्यावत माहितीकरिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाव्दारे निर्मित गुगल प्ले स्टोअरवरील दामिनी अँप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा. वादळी वारा विजा चमकत असताना घरातील खिडक्या व दरवाजा बंद ठेवावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाराऱ्याच्या ठिकाणी व मजबूत इमारतीमध्ये आश्रय घ्यावा. घराबाहेर असल्यास ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर राहावे. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसुन हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये झाकावे. मोकळ्या तसेच लटकत्या तारापासून दुर राहावे. वारा वादळाचे स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये.  वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवुन द्यावी. हृद्याजवळील भागाच्या परीसराला मालिस करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केल्या आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*