आनंदाचा शिधा संच वितरण मुख्यमंत्र्यांनी साधला अकोल्यातील लाभार्थ्यांशी संवाद












अकोला,दि. १३(जिमाका)-  शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सणासाठी स्वस्त धान्य दुकान यंत्रणांमार्फत आनंदाचा शिधा वितरीत केला जात आहे. आनंदाचा शिधाचे प्रातिनिधीक वितरण व लाभार्थ्यांशी थेट संवाद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला. दुरदृष्य प्रणालीद्वारे साधण्यात आलेल्या या संवादात मुख्यमंत्री शिंदे यांनी अकोल्यातील  अमोल सातपुते व दुर्गा हरिसिंग ठाकूर यांच्याशी बातचीत केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यभरातील लाभार्थी व धान उत्पादक शेतकरी यांच्याशीही संवाद साधला.

नियोजन भवनाच्या दुरदृष्य प्रणाली कक्षात हा संवाद पार पडला.  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे तसेच लाभार्थी महिला पुरुष यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील शिधा प्राप्ती, त्याचे वितरण इ. बाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी सादर केली.

 मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी आनंदाचा शिधा मिळाला का? असा प्रश्न करुनच संवाद सुरु केला. लाभार्थी अमोल सातपुते म्हणाले की, त्यांना आनंदाचा शिधा मिळाला. त्यामुळे त्यांना त्यांचे सणानिमित्त गोडधोड खाऊन साजरे करता आले. बाजारभावापेक्षा खूप कमी दरात हा शिधा मिळाल्याने त्यांना आनंद साजरा करणे शक्य झाले असेही त्यांनी सांगितले. श्रीमती दुर्गा ठाकूर म्हणाल्या की, त्यांना रेशन दुकानातून आनंदाचा शिधा प्राप्त झाला. त्यात डाळ, रवा, तेल आणि साखर अशा वस्तू होत्या. या सर्व वस्तू उत्तम स्थितीत होत्या. या आनंदाचा शिधा  मुळे त्यांचे कुटुंब सण आता आनंदात साजरे करु शकेल.

जिल्हा पुरवठा अधिकारी काळे म्हणाले की,  जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे ३ लाख ३१ हजार ३५७ संच उपलब्ध झाले व त्यांचे वितरणही झाले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुंबई येथून दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या या कार्यक्रमात मुंबईहून अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ