जड वाहन प्रवेश बंदी, शिथीलता करण्यासंदर्भात मालधक्का व जड वाहतूक संघटनेव्दारे हरकती मागविल्या; गुरुवारी उपस्थित राहण्याचे आवाहन


  अकोला,दि. २८ (जिमाका)-  शहरातील जड वाहन, प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस यांना पोलिस विभागाव्दारे निश्चित केलेल्या मार्गावर प्रवेश बंदी  शिथीलत करण्यासंबंधी अधिसूचना निर्गमित करावयाचे आहे. या संदर्भात मलाधक्का व जड वाहतूक संघटनेव्दारे हरकत/आक्षेप असल्यास जिल्हाधिकारी यांच्या दालतान गुरुवार दि. 4 मे रोजी दुपारी 1.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे करण्यात आले.

            शहरातील मार्गावर जड वाहनांना वाहतुकी करीता रात्री 10 वाजता पासून सकाळी 8 वाजेपर्यंत मोकळीक देऊन,  सकाळी आठ वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पुर्णपणे प्रवेश बंदी करुन निवडक मार्गावर जिवनावश्‍यक/अत्‍यावश्‍यक वस्‍तुंची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथीलता देण्‍याची तसेच शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बसेस यांना प्रवासी चढ उतार करण्‍याकरीता निश्चित केलेल्या मार्गाचे वापर करण्‍याचे प्रस्ताव पोलिस विभागाने प्रस्तावित केले आहे. प्रस्तावित वेळापत्रक याप्रमाणे :

अ.क्र

अकोला महानगराचे बाहेरुन येणारे मार्ग

प्रस्‍तावीत प्रवेश बंदीची वेळ

1

बाळापूर नाका – भांडपुरा चौक – किल्‍ला चौक

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

2

वाशिम बायपास – हरीहरपेठ येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

3

उमरी नाका – टावर चौक कडे येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

4

आपातापा चौक ते शिवाजी पार्क कडून कोतवाली चौक कडे येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

5

मलकापूर – गौरक्षण रोड – हुतात्‍मा चौक – अशोक वाटिका मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

6

डाबकी रोड रेल्‍वे गेट कडुन शहरात येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

7

पोलीस मुख्‍यालय – सिटी कोतवाली कडे येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

8

वाशिम बायपास – भगतसिंग चौक – कडून नेहरु पार्क येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 14.00 पावेतो

दुपारी 16.00 वा ते 22.00 वा पावेतो

9

कौलखेड ते भगतसिंग चौक ते अशोक वाटिका कडे

सकाळी 08.00 ते 14.00 पावेतो

दुपारी 16.00 वा ते 22.00 वा पावेतो

10

शिवणी कडून – नेहरु पार्क चौक – अशोक वाटिका कडे येणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 14.00 पावेतो

दुपारी 16.00 वा ते 22.00 वा पावेतो

11

आपातापा चौक – रेल्‍वे स्‍टेशन चौक ते अशोक वाटिका चौक कडे

सकाळी 08.00 ते 14.00 पावेतो

दुपारी 16.00 वा ते 22.00 वा पावेतो

 

अ.क्र

अकोला शहर अंतर्गत मार्ग

प्रस्‍तावीत प्रवेश बंदीची वेळ

1

रेल्‍वे स्‍टेशन माल धक्‍का ते पो.स्‍टे रामदास पेठ कडून दामले चौक ते फतेह अली चौक मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

2

अकोट स्‍टॅण्‍ड कडून अग्रसेन चौक कडे जाणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

3

भांडपुरा चौक – डाबकी रोड कडे जाणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

4

शालीनी टॉकीज (सिटी कोतवाली चौक) आपातापा चौक

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

5

दगडी पुल – माळीपुरा चौक – मामा बेकरी टी पॉईंट – बियाणी चौक पर्यंत

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

6

जठारपेठ ते अग्रसेन चौक

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

7

टॉवर चौक ते फतेह चौक कडे जाणारा मार्ग

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

8

नेहरु पार्क ते रतनलाल प्‍लॉट चौक

सकाळी 08.00 ते 22.00 पावेतो

 

अ.क्र

प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस मार्ग

प्रवासी चढ - उतार करणे करीता नेमलेले ठिकाण

1

खामगाव - बाळापूर - अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

निमवाडी लक्‍झरी बस स्‍टॅण्‍ड

2

वाशिम – पातूर – अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

निमवाडी लक्‍झरी बस स्‍टॅण्‍ड

3

अकोट – अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

आपातापा चौक

4

दर्यापूर – अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

आपातापा चौक

5

अमरावती – मुर्तीजापूर – अकोला या मार्गाने प्रवासी वाहतूक करणारे लक्‍झरी बसेस

रामलता लक्‍झरी पॉईंट

 

            वरील प्रास्तावित केलेल्या मार्गावर आक्षेप/हरकत दाखल करावयाचे असल्यास अथवा काही कायदेशीर म्हणणे मांडावयाचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात व्यक्तीश: अथवा प्राधिकृत प्रतिनिधीनी उपस्थित राहून बाजू मांडावी. त्यानंतर आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ