कोविडः चार पॉझिटीव्ह


            अकोला दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 87 जणांचा अहवाल प्राप्त झाला.  त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.4 व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4.

आरटीपीसीआर ‘चार’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व तीन महिलांचा समावेश असून हे रुग्ण पातूर येथील एक व उर्वरित तीन जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.

सक्रिय रुग्ण ‘19

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66201(50068+15142+991) आहे. तर एक  रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 19 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ