महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना महाराष्ट्र दिनी मिळणार नियुक्ती प्रमाणपत्र

अकोला दि.28(जिमाका)-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे घेण्यात आलेल्या परिक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दि. ‍1 मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे वस्तू व सेवा कर कार्यालयाचे  उपायुक्त एस.एस. बनकर यांनी कळविले आहे. अकोला जिल्ह्यातील नियुक्तीस पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.1 मे रोजी सकाळी 7 वाजता उपस्थित राहावे. यासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असल्यास वा अधिक माहितीकरिता वस्तू व सेवाकर कार्यालयाचे राज्यकर अधिकारी सुनिल गोलोकार यांच्या मो.क्र. 7588501532  वर संपर्क साधावा, असे आवाहन वस्तू व सेवाकर कार्यालयाचे उपायुक्त एस.एस.बनकर यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा