कोविडः ‘तीन पॉझिटीव्ह’


   अकोला दि.1(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 67 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3 व खाजगी 0)3+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 3.

आरटीपीसीआर ‘तीन’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुषाचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील दोन व उर्वरित एक अकोला महानगपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘23’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66133(50000+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 23 सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील सहा रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 17 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना