‘सखी वन स्टॉप सेंटर’;सहाय्य सेवा दुरध्वनी निर्देशिकेचे प्रकाशन

 


अकोला, दि.२५(जिमाका)- महिला व बालविकास विभागाच्या वतीन अत्याचारग्रस्त व निराधार महिलांना  तातडीने मदत देण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर चालविण्यात येते. या सेंटरच्या वतीने सहाय्य सेवा दुरध्वनी निर्देशिकेचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गृह शिंदे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, अशासकीय सदस्य सुषमा शुक्ल, साधना येवले, निशा ग्यारल, ॲड. प्रवीन तायडे, ॲड. मनिषा भोरे, जिल्हा परिविक्षा अधिकारी शिरीष पुसदकर आदी उपस्थित होते. या निर्देशिकेत महिलांना लागणारे सहाय्य मिळण्यासाठी आवश्यक दुरध्वनी क्रमांकांचे संकलन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ