जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा २०२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 अकोला,दि. १९(जिमाका)-  जवाहर नवोदय विद्यालयाची इयत्ता ५ वी च्या वर्गासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार दि.२९ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनीऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यांचे परीक्षा प्रवेश पत्र  हे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते त्यांनी तेथून डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन प्राचार्य आर.एस. चंदनशिवे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र हे  https:/cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करुन घ्यावे. काही विद्यार्थ्यांनी एका पेक्षा अधिक वेळेस रजिस्ट्रेशन केले आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन पावती तपासून त्याबरोबर असणाऱ्या क्रमांकाचेच प्रवेशपत्र डाऊनलोड करावे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर दि.२९ रोजी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत प्रवेश पत्र, विद्यार्थ्याचे व पालकाचे आधार कार्ड फोटो कॉपी,  काळा/ निळा बॉल पॉईंट पेन, मास्क इ. साहित्य घेऊन उपस्थित रहावे. प्रवेश पत्रावर दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करावे,असे प्राचार्य चंदनशिव यांनी कळविले आहे.  

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ