जि.प. शाळा गाजीपूर येथे बाल हक्कांबाबत मार्गदर्शन

 



अकोला,दि. १८(जिमाका)-  जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा गाजीपुर डाकळी ता मुर्तिजापूर येथे इयत्ता ७ विच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शनिवारी (दि.१५)आयोजित करण्यात आला. यानिमित्त ‘बालकांचे हक्क, अधिकार व संरक्षण कायदा अंतर्गत सुरक्षित व असुरक्षित स्पर्श’ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी  देवीताई दिवनाले या होत्या. बालकल्याण समिती सदस्य प्रांजली जैस्वाल, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसतकर,पोलीस पाटील भावने, सरपंच स्वप्निल तंवर,केंद्रप्रमुख श्रीमती नेमाडे, मुख्याध्यापक जवादे आदी मान्यवर उपस्थित होते. पूजा पुसटकर यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक श्रीमती टोटलकर यांनी केले. आभार प्रदर्शन कोकणी यांनी केले. कार्यक्रमासशाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई तसेच आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश गडाम, दिगंबर महल्ले, शारदाताई सरवार, साधनाताई तायडे यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ