कोविडः ‘दोन पॉझिटीव्ह’


   अकोला दि.9(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 66 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 2.

आरटीपीसीआर ‘दोन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘38

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66166(50033+15142+991) आहे. दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 38 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील पाच रुग्ण  रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 33 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना