कोविडः ‘एक पॉझिटीव्ह’


   अकोला दि.3(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 17 जणांचा अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.

आरटीपीसीआर ‘एक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून हा रुग्ण अकोला महानगपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘23’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66136(50003+15142+991) आहे. तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 23 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील दोन रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 21 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ