महात्मा फुले जयंतीनिमित्त आज (दि.11) योजनांची जनजागृती


   अकोला दि.11(जिमाका)- महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि.11 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सामाजिक न्याय विभागातर्फे  सामाजिक न्याय भवन, निमवाडी येथे विविध स्पर्धा व उपक्रम सकाळी 10 वाजेपासूनइ आयोजित करण्यात आले आहे. यात सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त विविध महामंडळाच्या योजनांची माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे, असे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे,

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत  पात्र लाभार्थ्यांना विशेष घटक योजना व बीज भांडवल योजना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनांचा लाभ चर्मकार समाजाच्या अर्जदारास घेता येतो. त्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, (सर्व झेरॉक्स प्रती), पासपोर्ट फोटो तीन प्रती,  शाळा सोडल्याचा दाखला, दरपत्रक, रहिवासी दाखला,टॅक्स पावती, संमती पत्र, प्रतिज्ञा पत्र, बॅंक पासबुक, पॅन कार्ड, व्यवसायासाठी ना हरकत दाखला, जागेचा 8 अ किंवा नमुना ड उतारा, व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल (1 लाख रुपयांच्या वर किंमत असल्यास) इ. कागदपत्रे आवश्यक आहेत,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ