शासकीय व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक


अकोला,दि.21(जिमाका)- सार्वजनिक क्षेत्रातील  शासकीय - निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र महास्वंयम या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने सर्व आस्थापनानी मार्च 2023 अखेरचे त्रैमासिक विवरण रविवार दि. 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धीतीने सादर करावे, असे जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी कळविले आहे.

सर्व शासकीय व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसुचीत करण्याची सक्ती करणारा कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार नियोक्त्यांना नमुना ईआर-1 मध्ये नियमीतपणे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक व सक्तिचे आहे. त्याअनुषंगाने माहे मार्च-2023 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकीय माहीती सादर करण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन नोंदणीकृत सर्व आस्थापनांना यापुर्वीच युझर नेम व पासवर्ड पाठविण्यात आले आहेत. त्या  युझर नेम व पासवर्डचा वापर करुन www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन होऊन माहे मार्च-2023 अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र दि. 30 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावे.

   प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील नोंदवून अद्यावत करावा. तसेच त्रैमासिक ईआर-1 किंवा आपला नोंदणी तपशील अद्यावत करतांना तांत्रिक अडचण आल्यास akolaroigar@gmail.com या ईमेल किंवा कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0724-2433849 व मो.क्रमांक 9665775778  वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ