महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट ‘ब’ व ‘क’ संयुक्त पुर्व परीक्षा परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश


अकोला,दि.27(जिमाका)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवार दि. 30 एप्रिल रोजी जिल्ह्यातील 41 उपकेंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पुर्व परिक्षा-2023 चे आयोजन होणार आहे. परीक्षा  केंद्रावर गैरप्रकार, कायदा व सुव्यवस्था निर्माण होवू नये व परिक्षा शांततेत पार पाडण्याकरिता रविवार दि. 30 एप्रिल रोजी सकाळी सहा ते रात्री आठवाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या 100 मीटर परिसरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उपकेंद्र याप्रमाणे :

1.      स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणा रोड, कौलखेड, अकोला

2.      शिवाजी आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, मार्णा बिल्डींग, शिवाजी पार्क, अकोट रोड, अकोला

3.      खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेन्ट, विजय हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रोड, अकोला

4.    जागृती विद्यालय व उच्च माध्य विद्यालय, रणपीसे नगर, अकोला

5.     प्रभात किड्स पातिूर-वाशिम रोड, अकोला

6.     श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, मुर्तिजापूर रोड, नेहरु पार्कजवळ, अकोला

7.     कॉलेज ऑफ इजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी बाभुळगांव, मुर्तिजापूर रोड, अकोला

8.     मांगीलालजी शर्मा विद्यालय व महाविदयालय, वानखडे नगर, डाबकी रोड, अकोला

9.      एल.आर.टी. कॉलेज ऑफ कॉमर्स, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन, नेकलेस रोड अकोला भाग -1

10.  एल.आर.टी. कॉलेज ऑफ कॉमर्स, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन, नेकलेस रोड अकोला भाग -2

11.   सिताबाई कला महाविदयालय, सिव्हील लाईन रोड, अकोला

12.  भारत विदयालय, तापडीया नगर, अकोला

13.  श्री शिवाजी हायस्कूल, मुख्य शाखा देशमुख पेठ, शिवाजी पार्कजवळ, अकोट रोड, अकोला

14. डवले ज्युनिअर कॉलेज, चाचोंडी रोड, मोठी उमरी, अकोला

15. दि.नोएल इंग्लिश हायस्कूल, विभागीय वर्कशॉपच्या मागे, कौलखेड रोड अकोला

16.  उस्मान आझाद ऊर्दु हायस्कूल, रतनलाल प्लॉट चौक,अकोला

17. भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट डाबकी रोड, जुने शहर, अकोला

18. जि.एस. कॉन्व्हेंट मुख्य पोस्ट ऑफीसच्या मागे, अकोला

19.  ज्युबिली इंग्लिश हायस्कूल/ ज्युनिअर कॉलेज, रामदासपेठ पोलीस स्टेशन जवळ अकोला

20. श्रीमती मोहरीदेवी खंडेलवाल विदयालया, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड जुने शहर, अकोला

21.  श्री शिवाजी विद्यालय, हरीहर पेठ, जुने शहर, अकोला

22. न्यु इंग्लिश हायस्कूल, शिक्षण संकूल रामदासपेठ पोलीस स्टेशन जवळ अकोला.

23. राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल सायन्स कॉलेज सिव्हील लाईन रोड अकोला

24.  डि. ए. व्ही. कॉन्व्हॅट स्कूल, महात्मा गांधी रोड, अकोला

25. कोठारी कॉन्हेन्ट इंग्लीश स्कूल, विदयानगर गोरक्षण रोड, इन्क्म टॅक्स चौक, अकोला

26.  सावित्रीबाई फुले जि. प. माध्य.कन्या शाळा,दामले चौक, वंसत देसाई स्टेडियम, स्टेशन रोड

27. स्व. ज्योती जानोळकर विदयालय व उच्च माध्यालय, कपिलवस्तु नगर, अकोला

28. गुरूनानक विद्यालय, गांधीनगर, सिधी कॅम्प अकोला

29.  होलीक्रॉस कॉन्व्हेंट, जठारपेठ चौक अकोला

30.  मुंगीलाल बाजोरीया कॉन्व्हेंट, जठारपेठ चौक, अकोला

31.  मेहरबानो ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महात्मा गांधी रोड प्रमिलाताई ओक हॉल जवळ अकोला

32. श्री. नथमल गोयनका कॉलेज, रतनलाल प्लॉट चौक, अकोला

33. मनुताई कन्या शाळा, टिळक रोड, कोतवाली पोलीस स्टेशन जवळ, अकोला

34.  एन.व्ही.व्ही. स्वावलंबी विद्यालय ॲन्ड श्री राधाकृष्ण शुक्ला उच्च मा.वि., अकोला

35. आदर्श विदयालय, सहकार महर्षी डॉ. अण्णासाहेब कोरपे नगर, आदर्श कॉलनी अकोला

36. सुधाकरराव नाईक कला, विज्ञान, उमाशकर खेतान वाणिज्य कॉलेज संत तुकाराम चौक अकोला

37.   नुतन हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा टिळक रोड, अकोला

38. अकोला आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेज सहकार नगर, गोरक्षण रोड, अकोला

39. विद्यामंदिर कन्या शाळा सिव्हील लाईन पोलिस स्टेशन जवळ, अकोला

40.  सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मलकापूर नित्यानंद नगर, गोरक्षण रोड, अकोला

41.  बी.आर.हायस्कूल ताजनापेठ, मुख्य पोस्ट ऑफिसच्या मागे, अकोला

 

परीक्षा केंद्रावरील उपाययोजना

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी  पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार  नाही, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही. परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात येईल. सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य राहिल. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.  परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल, फोन, सेल्युलर, प्लॅन ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यात मनाई राहील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करावे. वरील प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचे बाबत परीक्षा संबंधीत कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ