वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली माझोड येथे पिक नुकसानीची पाहणी






अकोला,दि.10 (जिमाका)-   अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज माझोड ता. अकोला येथे प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याबाबत आश्वस्त केले.त्यांचे समवेत विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. हरिष पिंपळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तहसिलदार सुनिल पाटील आदी उपस्थित होते. श्री. महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चौकशी केली. तातडीने पंचनामे पूर्ण करुन शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत आश्वस्त केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ