अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन


            अकोला दि.25(जिमाका)-प्रादेशीक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि. 29 एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. यादरम्यान ताशी 40-50 किमी याप्रमाणे वारा वाहणाची शक्यता आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षीत ठिकाणी साठवावा.  बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षीत ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही;याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केल्या आहेत. यासुचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार एस.पी.ढवळे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ