डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आज (दि.28) मुलांच्या वसतीगृहाचे उद्घाटन

 

            अकोला दि.27(जिमाका)- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ‘प्रतापगड’ मुलांचे वसतीगृहाचे उद्घाटन  शुक्रवार दि. 28 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता कृषीमंत्री, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा प्रतिकुलपती अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी दिली.

            या समारंभाला कुलगुरु डॉ. शरद गडाख, विधान परिषद तथा कार्यकारी परिषद सदस्य अमोल मिटकरी, आमदार विप्लव बाजोरीया,  विधानसभा तथा कार्यकारी परिषदचे सदस्य आमदार रणधीर सावरकर, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार अमित झनक, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, जनार्दन मोगल, मोरेश्वर वानखडे, प्रशांत कुकडे, केशवराव तायडे, श्रीमती हेमलता अंधारे, डॉ. विजय माहोरकर, डॉ. वाय.जी. प्रसाद, शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी संचालक डॉ. श्यामसुंदर माने, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांची प्रमुख उपस्थिती असेल,असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ