लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; थेट कर्ज योजना; लाभार्थ्यांची बुधवारी(दि.12) होणार निवड

 

            अकोला दि.3(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णासाहेब साठे विकास महामंडळ मर्या. अकोलाव्दारे थेट कर्ज योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 157 पात्र लाभार्थ्यांपैकी 30 लाभार्थ्यांची  इश्वरचिठ्ठीव्दारे निवड करण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया बुधवार दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे होणार आहे. पात्र लाभार्थ्यांने स्वत: उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले.

            साहित्यरत्न लोकशाहीर अण्ण्णसाहेब साठे विकास महामंडळ मर्या. अकोलाव्दारे प्रकल्प मर्यादा 1 लाख थेट कर्ज योजनेसाठी दि. 28 डिसेंबर ते 24 जानेवारी 2023 दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. अकोला जिल्हा कार्यालयासाठी 30 मागणी अर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये 15 महिला व 15 पुरुष लाभार्थ्यांचे  ईश्वरचिठ्ठीव्दारे निवड करण्यात येणार आहे. तथापि थेट कर्ज योजनेअंतर्गत 163 अर्ज प्राप्त झाले असून त्यात 157 अर्ज पात्र तर 6 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी 118 पुरुष व 39 महिला लाथार्थी आहेत. अपात्र लाभार्थ्यांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी 30 लाभार्थ्यांची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात येणार आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ