कोविडः तीन पॉझिटीव्ह
अकोला दि.29(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 55 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.3 व खाजगी 0)3+रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 3.
आरटीपीसीआर
‘तीन’
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व दोन महिलांचा समावेश असून हे रुग्ण बार्शीटाकळी येथील एक व उर्वरित दोन जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.
सक्रिय रुग्ण ‘22’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66204(50071+15142+991) आहे. तर सद्यस्थितीत
जिल्ह्यात 22 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा