जत्रा शासकीय योजनांची: विभागनिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 





 अकोला,दि. २८ (जिमाका)- ‘जत्रा शासकीय योजनांची’, या उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावयाचा आहे. त्याअनुषंगाने आपल्या विभागाच्या योजना व त्या योजनांचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी यांची यादी निश्चित करुन सर्व विभागांनी माहिती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

‘जत्रा शासकीय योजनांची’ या उपक्रमाबाबत आज मुख्यमंत्री सचिवालयातील समन्वयक अधिकारी कैलास देवरे व डॉ. अमोल शिंदे यांनी जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा मनोज जाधव, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

समन्वयक कैलास देवरे यांनी सांगितले की, या अभियानात १५ मे पर्यंत लाभार्थ्यांची माहिती संकलित करावयाची आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी आपापल्या विभागामार्फत लाभ द्यावयाच्या योजना व त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.  दि.१५ मे ते १५ जून या कालावधीत शिबिर स्वरुपात नियोजन करुन लाभाचे वितरण करावे.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा. तसेच विद्यार्थी, गोर-गरीब, महिला, दिव्यांग अशा प्राधान्याने लाभ द्यावयाच्या घटकांना लाभ पोहोचवावा,असे आवाहनही त्यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ