कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविले


             अकोला दि.24(जिमाका)- कृषि विभागामार्फत  कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्‍या  व्यक्ती, गट व संस्थांना विविध कृषि पुरस्कार दिल्या जातो. त्याअनुषंगाने सन 2022 या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून शेतकरी, गट व संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी नजीकच्‍या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 जुनपर्यंत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषि उपसंचालक अश्विनी भोपळे यांनी केले.

            कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था व गट यांना  डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. विविध कृषि पुरस्कारांसाठी जास्‍तीत जास्‍त शेतकरी, गट, संस्था व व्यक्ती  यांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपला प्रस्ताव नजीकच्‍या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन आयुक्त (कृषी) सुनील चव्‍हाण यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ