राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन; बाळाच्या विकासासाठी एक हजार दिवस महत्वाचे- आमदार हरिष पिंपळे





अकोला दि.11(जिमाका)-  बालकांचे सर्वागीण विकासासाठी माता गर्भधारणेपासून ते बालकांचे दोन वर्षापर्यंतचे एक हजार दिवस महत्वाचे असतात. या कालावधीत बालकांचे शारीरीक, मानसिक व बौद्धीक विकास होतो. बालक व मातांना योग्य पोषण व आरोग्य सेवेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार हरिष पिंपळे यांनी केले.

            आरोग्य सेवेबद्दल जागरूकता वाढवून गरोदर मातांचे कल्याण आणि सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, डॉ. दुरधन, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, डब्लूएचओचे सल्लागार डॉ. पांढूरंगे सुदामे आदि उपस्थित होते.

युनिसेफचे राज्य सल्लागार डॉ. पांडुरंग सुदामे मार्गदर्शन करताना म्हणाले की, बालकांमधील कुषोषणाला प्रतिबंध करण्यासाठी शिशूना जन्मताच स्तनपान करणे आवश्यक आहे. मातेच्या दुधामधील पोषक घटकामुळे बालमृत्यू टाळता येतो. याकरीता बाळाला सहा महिने मातचे दूध देणे आवश्यक आहे. बालकांच्या सर्वागिण विकासासाठी मातेच्या गर्भधारनेपासून ते बाळांचे वय दोन वर्ष होईपर्यंत म्हणजेच एक हजार दिवस महत्वाचे असतात.  या कालावधीत मातेलाही पोषण आहार देणे गरजेचे आहे. याकरिता समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रीती सैतवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक्षक आप्पासाहेब डांबरे, प्रमोद ढेंगे, जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिका, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ