कोविडःआरटीपीसीआर चाचणी सात पॉझिटीव्ह,एकास डिस्चार्ज

 

 अकोला दि.2(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 96 अहवाल प्राप्त झाले. त्यात सात जणांचाअहवाल पॉझिटीव्ह आला. तर एकास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 7 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 7.

आरटीपीसीआर ‘सात’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात सात जणांचाअहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात चार महिला व तीन पुरुष रुग्णांचा समावेश आहे.  त्यातील दोघे मुर्तिजापूर येथील असून इतर सर्व अकोला मनपा हद्दीतील आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एकास डिस्चार्ज

आज दिवसभरात एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘25’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65931(49798+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 25 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील 10  रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 15 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना