डाक विभागाव्दारे जागतिक टपाल दिनानिमित्त प्रभात फेरी व वृक्षरोपण

 अकोला, दि.9(जिमाका)- भारतीय डाक विभागाद्वारे जागतिक टपाल दिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवर दि. 9 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अकोला डाक मंडळातील अकोला प्रधान डाकघर, मुर्तीजापुर उपडाकघर, अकोट उपडाकघर येथे आज(दि.9) सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करुन डाक विभागाच्या विविध योजनाचे फलक प्रदर्शित केले. तसेच डाक विभागाच्या विविध योजनाचे घोषणाव्दारे जनजागृती केली. ही प्रभात फेरी अकोला मुख्य डाकघर पासून सिटी कोतवाली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत व तेथून परत अकोला मुख्य डाकघर येथे समारोप झाला. या प्रभात फेरीमध्ये मोठ्या संख्येने डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिक्षक संजय आखाडे यांचेहस्ते अकोला प्रधान डाकघर येथे तर विभागीय कार्यालय अकोला येथे सहाय्यक डाक अधिक्षक सुनील एम. हिवराळे, सहाय्यक डाक अधिक्षक एन.एस.बावस्कर, तक्रार निरीक्षक तथा प्रभारी डाक निरीक्षक एस.एस.नानिर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी सर्व डाक कर्मचाऱ्यांनी डाक विभागातील आपल्या कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवून श्रमदान केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ