जि.प. व प.स.निवडणुक; अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकरीता दि.17 ऑक्टोंबर रोजी विशेष सभा


 अकोला, दि.6(जिमाका)- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा अडीच वर्षाचा कालावधी पुर्ण झाला असून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार या पदाची निवडणूककरीता सोमवार दि. 17 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता विशेष सभा जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या निवडणूकीकरीता पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   निवडणूकीकरीता नामनिर्देशन पत्र दि. 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत पिठासीन अधिकारी, अकोला यांचेकडे जिल्हा परिषद सभागृहात स्विकारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकीरता आरक्षीत राहिल, असे जिप/पंस/ग्राप निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी यांनी कळविले आहे.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ