मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प; मुल्यसाखळी विकासासाठी शेतकरी कंपन्यांकडून अर्ज मागविले


अकोला,दि.21(जिमाका)-  माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत राज्यातील समुदाय आधारीत संस्थांकडून मूल्यसाखळी विकासाचे  उपप्रकल्प  राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज शेतमाल संबधित मूल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांच्या विकासासाठी आहेत. त्यासाठी समुदाय आधारीत संस्था जसे शेतकरी उत्पादक कंपनी पात्र असतील. यासंदर्भातील सर्व माहिती, अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष इ. https://www.smart-mh.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी. तसेच माहिती भरावी व आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक, आत्मा यांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने दि.31 ऑक्टोंबरपर्यंत  सादर करावेत,असे जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे(स्मार्ट) प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम